कोळा परिसरात रिमझिम पावसामुळे डाळिंबाचे नुकसान
राज्य शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी- बिरा आलदर पंच

सांगोला तालुक्यातील कोळा कोंबडवाडी कराडवाडी परिसरात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका डाळिंबाला बसू लागला आहे. परिणामी, बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच कळी गळ, कळीचे सेटिंग न होणे अशा समस्या उद्भभुवू लागल्या आहेत. या डोंगरी भागातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी आ शहाजी बापू पाटील यांचे विश्वासु माजी ग्रामपंचायत सदस्य बिरा आलदर पंच यांनी केली आहे.
पुढे बोलताना बिरा आलदर पंच म्हणाले पाऊस असाच राहिला, तर बहरातील डाळिंबाचे नुकसान होऊन उत्पादनखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस आणि अगोदर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली असून यंदा डाळिंबाचा मृग बहर अनेक हेक्टरवर वास्तविक पाहता, गेल्या तीन ते चार वर्षांपासून मृग बहरातील डाळिंबाला परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा या बहरातील डाळिंब क्षेत्रात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. असे असले तरी, या हंगामातील डाळिंबाची निर्यात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धाडस करून हा बहर साधला आहे.
सध्याच्या स्थितीत बहुतांश भागात पाऊस सुरू झाला. परंतु या पावसामुळे डाळिंबावर फारसा परिणाम झाला नाही. त्यातूनही डाळिंबाच्या फुलकळीची सेटिंग झाली. पेरुऐवढ्या आकाराची फळे लागली मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. ज्या भागात पाऊस कमी आहे, त्याठिकाणी डाळिंबाचे पीक चांगले आहे.
अधूनमधून मोठा पाऊस, पावसाची रिमझिम, ढगाळ वातावरण या साऱ्याचा फटका डाळिंबाला बसू लागला आहे. डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून राज्य शासनाने मदत शेतकऱ्यांना द्यावी असे शेवटी बिरा आलदर पंच यांनी शेवटी सांगितले.