नाझरा विद्यामंदिर मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस साजरा*

नाझरा(वार्ताहर):- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून अमलात आले, त्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक दिवशी करण्यात आले आहे.आज नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेतील गणित शिक्षक विनायक पाटील,वसंत गोडसे, दिलावर नादाफ व लक्ष्मी कुकडे यांनी विद्यार्थ्यांना विविध संख्या ज्ञानाचे मार्गदर्शन केले.
मूलभूत गणिती क्रिया प्राप्त करण्याची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उपक्रम प्रशालेत आज विविध वर्गांमधून दिवसभर साजरे करण्यात आले.गणिती ज्ञानाची पायाभूत साक्षरता विद्यार्थ्यांच्या जीवनाला कशा पद्धतीने सकारात्मकता देते या विषयावर विस्तृत मार्गदर्शन वसंत गोडसे यांनी केले.
नियती माने, अल्फाज काझी व गौरी खळगे या विद्यार्थिनींनी थोर गणिती तज्ञांच्या जीवनातील काही कथांचे सादरीकरण केले.एकंदरीतच संपूर्ण दिवसभर प्रशाला गणिताच्या विविध उपक्रमामुळे गणितीय झाली होती. विविध प्रकारच्या गणिती क्रिया, गणिती कोडे त्याचबरोबर गणितातल्या विविध प्रकारच्या गमती जमती असे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या उपक्रमासाठी नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक बी.एस.माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर दिवसभराचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व गणिती शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.