न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण सप्ताहास उत्साहात प्रारंभ

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून या सप्ताहाची प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात मोठ्या उत्साहात झाली.
सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात अध्ययन अध्यापन साहित्य या उपक्रमाने झाली. सदरच्या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध तक्ते,चित्रे,विविध प्राणी व पक्षांचे मुखवटे बनविले त्याचबरोबर आव्हानात्मक कार्ड बनवले. त्याचबरोबर विद्यार्थांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचनकट्टा या नावाने विद्यार्थ्यांचा समूह बनवला. त्याअंतर्गत रोज एक तास वाचन करण्याची विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली. सदरच्या उपक्रमासाठी प्रशालेतील औदुंबर कांबळे सर,ख्रिस्तिना डोंगरे मॅडम,कविता शिंदे मॅडम,अनिल पवार सर,अनिल खरात सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थांचीगणित प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेण्यात आले. शासनाकडून उपलब्ध झालेल्या पीएसई कीटच्या सहाय्याने विविध गणिती कोडी विद्यार्थांनी सोडविली.विद्यार्थांना गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून गणितक्लब ची स्थापना करण्यात आली. सदरच्या या उपक्रमासाठी वैशाली घोडके मॅडम,निलोफर मुजावर मॅडम,राणी आदलिंगे मॅडम,रेश्मा खडतरे मॅडम,अमोल पाकले सर,अनुराधा लिगाडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदरच्या या शिक्षण सप्ताहास सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सप्ताहाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.