सांगोला रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांना छत्रीवाटप

सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला रोटरी क्लबकडून शहरातील धनगर गल्लीं येथील जि प प्रा.शाळा न.3 मधील गरजू विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी छत्र्यांचे वाटप काल मंगळवार दि.23 जुलै रोजी करण्यात आले.
रोटरी क्लब सांगोला कडून गेल्या काही वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम सुरु आहेत.समाजातील गोरगरीब व वंचितांना मदत मिळावी या दृष्टीने रोटरी क्लब सांगोलचे कार्य सुरु आहे. सन 2024- 25 या नूतन वर्षातील अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे व सचिव रो.इंजि.विलास बिले यांनी 150 प्रकल्पपूर्तीचा संकल्प सोडला आहे.त्याचाच एक भाग म्हणून जि प प्रा.शाळा न.3 मधील गरजू विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.छत्री मिळाल्यानंतर मुलाच्या चेहर्यावरचा आनंद अवर्णनीय होता.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जबीन मुलाणी मॅडम व सहशिक्षिका प्रणिता यादव मॅडम उपस्थित होत्या.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना भिजत पावसात शाळेत जावे लागते.विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून रोटरी क्लब सांगोला यानी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीवाटप केले.यावेळी रो.इंजि.विकास देशपांड रो.माणिक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास रो.शरणाप्पा हळ्ळीसागर, रो.डॉ.मच्छिंद्र सोनलकर, रो.इंजि.संतोष भोसले, रो.इंजि. अशोक गोडसे, रो.इंजि.मधुकर कांबळे, रो.मोहन मस्के, रो.अरविंद डोंबे गुरुजी, रो.राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते.