साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा; लहुजी क्रांती मोर्चा संघटनेची तहसीलदार सांगोला यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी

सांगोला(प्रतिनिधी):- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी लहुजी क्रांती मोर्चा संघटनेची तहसीलदार सांगोला यांचेकडे काल मंगळवार दि.23 जुलै रोजी निवेदनाव्दारे केली आहे.

शोषित, श्रमिक, कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बजावलेली भूमिका, दिलेले योगदान हे अमूल्य आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगातील 27 भाषेमध्ये प्रकाशित झालेले आहे. साता समुद्रापार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्यशाली इतिहास जगाला ठणकावून सांगणारे व भारत देशाची मान उंचावणारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना आजही उपेक्षित ठेवले जात आहे. राष्ट्रप्रेमाखातर मराठी साहित्याच्या माध्यमातून क्रांतीचे रणशिंग फुंकणारे अण्णा भाऊ साठे यांना तात्काळ भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.

निवेदन देते प्रसंगी विनोद रणदिवे, बापूसाहेब ठोकळे, दीपक बनसोडे, सचिन रणदिवे, इरशाद बागवान, अनिल साठे, आकाश रणदिवे, रोहित खंडागळे, रोहित रणदिवे, अभिजीत रणदिवे, सुरज रणदिवे, अण्णासो मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button