जवळे विद्यालयात शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरुवात.

जवळे(प्रशांत चव्हाण) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक22 जुलै 2024 ते रविवार दिनांक 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत उत्साहाने शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.विद्यालयाचे प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाला सुरुवात झाली.
यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उपक्रमाचे सादरीकरण केले. विविध प्रकारचे साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून त्याबद्दलची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना करून देत होते.प्रारंभी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे यांनी शैक्षणिक सप्ताह या उपक्रमाचे उद्देश सांगितले सन 2020 मध्ये जे नवीन धोरण स्वीकारले आहे त्याला चार वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने हा शैक्षणिक सप्ताह सुरू केला आहे.सर्वांनी शैक्षणिक व व्यावसायिक ज्ञान मिळवले पाहिजे असे मार्गदर्शन केले.सदरप्रसंगी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते