नीट-यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

नीटची प्रवेश परीक्षा पुन्हा घेणं योग्य ठरणार नाही .  फेरपरीक्षा घेतली तर 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर परिणाम होईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

 

मेडिकलला प्रवेश घेऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.नीट युजीची नीट युजींची  (Neet) फेरपरीक्षा होणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने  दिला आहे. मात्र एनटीएला  निकाल पुन्हा जाहीर करावे लागणार आहेत. परीक्षेचं पावित्र्य पूर्णपणे भंग झालं नाही असं आम्हाला वाटतं, गेल्या तीन वर्षांचे आकडे देखील आम्ही तपासले असं कोर्ट निर्णय देताना म्हणाले.

 

नीटची प्रवेश परीक्षा पुन्हा घेणं योग्य ठरणार नाही .  फेरपरीक्षा घेतली तर 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर परिणाम होईल.  फेरपरीक्षा घेतल्यास  शैक्षणिक वर्ष गडबडेल, अभ्यासक्रम देखील रखडेल.  या वर्षीचे निकाल आम्ही गेल्या तीन वर्षांच्या निकालांशी पडताळून पाहिले त्यातूनही काही गैरप्रकार झाला आहे असं आम्हाला वाटलं नाही, असे सुप्रीम कोर्ट म्हणाले. 

कथित नीट घोटाळ्याप्रकरणी (Neet Exam Scam)  सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court)  सुनावणी पूर्ण झाली आहे.   नीट प्रकरणी दाखल एकूण 40  याचिकांवर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. नीटची फेरपरीक्षा घेऊ नये अशी एनटीए आणि केंद्र सरकारची भूमिका होती. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले,  तपास अद्याप अपूर्ण आहे –  4750 केंद्रांपैकी कुठे अनियमितता आहे, याचे उत्तरही आम्ही केंद्राकडे मागवले होते. मात्र, आयआयटी मद्रासनेही या प्रकरणाचा आढावा घेतला. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे  परीक्षेचं पावित्र्य पूर्णपणे भंग झालं नाही असं आम्हाला वाटतं

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button