महाराष्ट्र
उमेदवारांच्या खर्च तपासणी पथकाचे काम युद्धपातळीवर

सांगोला : प्रतिनिधी):-सांगोला विधानसभा मतदारसंघातील एकूण 13 उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा अहवाल खर्च तपासणी
तीन वेळा पूर्ण झाली असल्याची माहिती सहा.खर्च निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली
यावेळी शिंदे म्हणाले खर्च पथकाकडे प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधी यांनी अहवाल सादर करावा लागतो यामध्ये आमच्या विभागातील खर्च पथकाने आतापर्यंत तीन वेळा तपासणी केली आहे खर्च तपासणी पथकाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदर्श मार्गदर्शक सूचना व तत्वानुसार उमेदवारांनी त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याने उमेदवारांना खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे त्याबाबतचा होणारा खर्च पथकाकडे सादर करावा लागतो याबाबत खर्च निरीक्षक के. पी. जयाकर यांच्या व निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची तपासणी प्रक्रिया पार पाडली
दि.८,१२ व १६ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांच्या खर्चाच्या तीन वेळा तपासण्या करण्यात आल्या असून सदर खर्च तपासणी पथकात पथक प्रमुख उपकोषगार अधिकारी गजेंद्र घोडके, लेखापाल धनाजी साळुंखे,लेखापारीक्षक जितेंद्र गायकवाड नगरपरिषद सांगोला, प्रकाश लिगाडे, इम्रान शेख, राहुल कडगंची इत्यादी कर्मचारी उपस्थिती होते.यावेळी निवडणूक खर्च नोंदवण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी व शंका बाबत समाधान करण्यात आले.खर्चातील तफावती आढळून आल्या त्या उमेदवाराना नोटीस देण्यात आल्या आहेत.खर्च निरिक्षक के पी जयाकर यांनी नोंदवलेल्या खर्चाची तपासणी केली व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी सर्व उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.



