मोठी बातमी: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले….

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. मात्र, आज मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना त्यांचं कारण देखील सांगितलं आहे. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.
मनोज जरांगेंची तब्येत ढासळली
मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळल्याने चालली आहे. जरांगेंची शुगर 62 तर बीपी 98 पर्यंत गेला आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमधून ही बाब समोर आली आहे. जरांगेंची सर्व तपासणी करणाऱ्या डॉ. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची खूप जास्त गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहेत. जरांगेंनी असं न केल्यास ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणालेत.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगेंनी पुढे म्हटलं आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो. रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले. सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे म्हणालेत.
या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचंं कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
बीडच्या नेत्याचं पण तसेच केलं त्यांच्याच बापाने भाजप वाढवली त्यांनाच पाय खाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी संपवलं, मराठ्यांच्या ओडताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.