न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण सप्ताहातील क्रिडा दिवस उत्साहात साजरा

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून सप्ताहाचा तिसरा दिवस क्रिडा दिवसाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर,प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर,जेष्ठ शिक्षक दत्तात्रय पांचाळ सर,औदुंबर कांबळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रिडाशिक्षक सचिन हजारे सर व प्रा.हिंमतराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांनी प्रशालेच्या प्रांगणात धावत ज्योत आणली. यांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक क्रिडा प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर सचिन हजारे सरांनी विद्यार्थांना शालेय जीवनातील खेळाचे आणि व्यायामाचे महत्व सांगून खेळामुळे अनेक विद्यार्थांचे आयुष्य घडल्याचे सांगितले. दुपारच्या सत्रामध्ये इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे खो-खो,कबड्डी आणि क्रिकेटचे सामने घेण्यात आले.
त्याचबरोबर वैयक्तिक क्रिडाप्रकारात धावणे ,उंच उडी,लांब उडी,गोळा फेक या स्पर्धा घेण्यात आल्या.सदरच्या या सर्व क्रिडा प्रकारांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवून आपले क्रिडा कौशल्य सादर केले. सदरच्या उपक्रमासाठी प्रशालेतील सचिन हजारे सर,नेताजी पाटील सर,सूरज बाबर सर,वसंत आलदर सर,किरण पवार सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदरच्या या शिक्षण सप्ताहास सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सप्ताहाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या