सुनील कांबळे यांच्या हत्येबद्दल नाझरे गाव बंद

नाझरे प्रतिनिधी:- महूद ता. सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ कांबळे यांच्या हत्येबद्दल नाझरे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
सुनील कांबळे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करणे व जलद गती न्यायालयात सदरचा खटला वर्ग करून, विशेष सरकारी वकील द्यावा तसेच कुटुंबातील एका सदस्य शासकीय सेवेत सामावून घेणे.याबाबतचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे, मंडल अधिकारी हरीश जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण आलदर, नितीन भाऊ रणदिवे व योगेश भाऊ देवकुळे व मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले. यावेळी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊ असे अधिकारी वर्गातर्फे सांगण्यात आले