डॉ.प्रा.संदेश कांबळे यांचा सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप तर्फे सत्कार.

सांगोला- सांगोला शहरातील श्रद्धा क्लासेसचे संचालक प्रा.संदेश कांबळे याना नुकतीच अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापुर यांच्या वतीने फ़िजिक्स विषयातील संशोधना बद्दल मानाची अशी पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.त्या प्रित्यर्थ सांगोला विद्यामंदिर रीटायर्ड ग्रुप तर्फे डॉ.कांबळे यांचा संस्थाध्यक्ष गुरुवर्य प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील संस्था कार्यालयात सदर कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ.प्रा.संदेश कांबळे हे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे माजी विद्यार्थी असुन त्यांनी एम.एस्सी.फ़िजिक्स केल्या नंतर सांगोला शहरात श्रद्धा क्लासेस् सुरु करुन अनेक वर्षे इ .अकरावी व बारावी शास्त्र वर्गातील विद्यार्थ्यांना फ़िजिक्स,केमिस्त्री व मैथस या विषयाचे अध्यापन करुन विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग शाखेचा मार्ग दर्शविला.मात्र ज्ञानार्जन करताना स्व्तःच्या राहून गेलेल्या शिक्षणाची ओढ गप्प बसू देत नव्हती.कालांतराने त्यानी क्लासेस बन्द करुन स्व्तःची राहिलेली शिक्षणाची ओढ पुर्ण करण्यासाठी सोलापुर विद्यापिठात पी.एच.डी.साठी नोंदणी केली.नुकतीच त्यांची पी.एच.डी.पुर्ण झाली असुन त्याना डॉक्टरेट मिळाल्याची माहिती प्रा.राजाभाऊ ठोंबरे यानी प्रास्ताविकात दिली.त्याच प्रमाणे रीटायर्ड ग्रुप घेत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली.सत्काराला उत्तर देताना डॉ.कांबळे यानी सांगोला विद्यामंदिर व सान्गोला महाविद्यालयामुळे जीवनाला गती व दिशा मिळाल्याचे सांगून गुरुजनांचे ऋण व्यक्त करून सत्कारा बद्दल ग्रुपचे आभार मानले.ग्रुप सद्स्य घेत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन एखादी ऐक्टिविटी कांबळे फार्म हाउस वर घेण्यासाठी निमंत्रण दिले.
नुकतीच गुरु पौर्णिमा झाल्याने संस्था सचिव व ज्येष्ठ गुरुवर्य म.श.घोंगडे यांचा सत्कार झपके सर यांच्या हस्ते करण्यात आला.त्याच प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात झपके सरांचा सत्कार सुभाष महिमकर,अमर गुळमिरे,सुधाकर म्हेत्रे,भिमाशंकर पैलवान व नारायण विसापुरे यांच्या हस्ते करण्यात आला.आभार प्रदर्शन भीमाशंकर पैलवान यानी केले.या कार्यक्रमास प्राचार्य अमोल गायकवाड,अपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,ग्रुप सद्स्य नागन्नाथ गयाळी,उपस्थित होते.