रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने अजनाळे येथे रायला

रोटरी क्लब सांगोला यांनी रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड या कार्यक्रमांतर्गत सांगोला परिसरातील ग्रामीण भागातील तीन हजार विद्यार्थ्यांचा रायला घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार प्रत्येक शनिवारी एका शाळेवरती रायला घेण्याचे नियोजन केले आहे. आज शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 23 रोजी विकास विद्यालय, अजनाळे. या ठिकाणी रायला घेण्यात आला.
1.यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे कोणते स्वप्न आहे हे विचारले जाते विद्यार्थी अगदी आनंदाने आपले स्वप्न सांगतात व त्या 2.स्वप्नासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे हे समजावून सांगणे ही पुढची पायरी आहे. 3.त्यानंतर मुलांना कोणते गुण आवश्यक आहेत हे शिकवले जाते. त्यानंतर मुलांना तुमच्या समोरचे आदर्श कोण आहेत ?असे विचारले जाते तेव्हा विद्यार्थी आई-वडील, भाऊ आपले गुरुजन यांची नावे सांगतात. तसेच त्यांच्या परिचयातील यशस्वी माणसांची नावे सांगतात. मग मुलांना त्यांचे चरित्र वाचावे त्यांनी कसा संघर्ष केला हे अभ्यास व्हावे असे सांगितले जाते. 4. शेवटी एक कृती करवून घेतली जाते त्यामध्ये डोळे बंद करून कागद कापण्यासाठी सांगितला जातो व त्या सूचना विद्यार्थी नीट ऐकत नाहीत.तसेच डोळे बंद असल्यामुळे नीट कृती होत नाही. यातून त्यांना संदेश दिला जातो की,
आपल्या ध्येयाप्रती आपण डोळे झाक करून चालणार नाही, तर डोळे व कान उघडून नीट ऐकून आपण ध्येयाप्रत वाटचाल केली पाहिजे.तसेच त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वात गुणात्मक वाढ करणे आवश्यक आहे हे समजावून सांगितले जाते.
अशाप्रकारचा रायला आतापर्यंत अडीच हजार विद्यार्थ्यांवर घेण्यात आलेला आहे. आजचा रायला घेण्यासाठी रो.मधुकर कांबळे रो.विकास देशपांडे रो. संतोष भोसले रो.डॉक्टर अनिल कांबळे रो.बशीरभाई तांबोळी रो.साजिकराव पाटील हे उपस्थित होते. रायला झाल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व संस्थापक अध्यक्ष यांनी रोटरी क्लबचे धन्यवाद व्यक्त केले.