कोळे व परिसरातील ग्रामस्थांनी केलेला सत्कार पुढील कार्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी आणि पाठबळ देणारा ठरेल : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

गजी ढोलाचा ठेका -हलगीचा निनाद आणि फटाक्याच्या अतिषबाजीत आबांचे कोळानगरीत धुमधडाक्यात जंगी स्वागत
मागून मिळत नाही, ते प्रत्येकाच्या नशीब असावे लागते. आणि देताना लोकांची भावना चांगली असावी लागते. आज त्याच चांगल्या भावनेने सर्वांनी एकत्रित येऊन माझा सत्कार आणि सन्मान केला, हे माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. गावातील नागरिकांनी एकोप्याने एकत्रित यावे आणि मला सन्मानित करावे यापेक्षा मोठा आनंद आयुष्यात कोणताच असू शकतं नाही. आज माझा एकत्रित येऊन सत्कार केला यामुळे मी मनापासून धन्य झालो आहे. कोळे ग्रामस्थांनी केलेला सत्कार आणि दिलेले प्रेम आणि आपुलकी पुढील कार्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी आणि पाठबळ देणारे ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची निवड झाल्याबद्दल कोळे ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि. 5 मार्च रोजी अर्जुन चौक कोळे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामदैवत श्री. लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन, श्री. श्री. श्री. कोळेकर महाराज यांचे आबांनी आशीर्वाद घेतले. कोळे ग्रामस्थांच्या वतीने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना तुळशीचा हार घालून टाळ, वीणा, आणि संत तुकाराम महाराज यांच्यासारखी पगडी घालून सत्कार केला.
पुढे बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, राजकारण समाजकारण करताना कोणताही पक्ष जात-पात न पाहता आलेल्या लोकांची प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सेवा करण्याचे काम आजपर्यंतच्या काळात केले आहे. माझ्याकडे आलेल्या माणसाची फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकाला मोकळ्या हाताने परत जाऊ दिले नाही. निवडणूक सोडून इतर वेळी केवळ समाजकारण केले आहे. ही साळुंखे पाटील घराण्याने मला शिकवण दिली आहे. दुष्काळी जनतेची ओळख पुसली पाहिजे यासाठी कै. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यापासून आमचा लढा आहे. राजकारण समाजकारण करताना कोणताही स्वार्थ ना कोणताही वेगळा हेतू नसून केवळ तालुक्याचा विकास हाच एकमेव हेतू आहे. ज्या ज्या वेळी नागरिकांना अडीअडचणी आल्या यामध्ये रात्री – अपरात्री देखील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. या कार्याची खरी शिदोरी काका आणि काकींचा आशीर्वाद आहे. असे सांगत कोळे ग्रामस्थांनी मोठ्या आत्मीतेने माझा सन्मान केला भविष्यात असेच प्रेम ठेवावे असे ऋण व्यक्त करीत हा सत्कार माझ्या अविस्मरणीय राहील असे ही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
तर शिवाजीराव कोळेकर यांनी जातपात पक्ष न मानता आलेल्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे ही भूमिका घेणारा तालुक्यातील एकमेव नेता म्हणजे आबा आहेत. आबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळत आहे. गावातील साधा कार्यकर्ता देखील मोठा झाला पाहिजे ही भूमिका फक्त दिपकआबा मध्ये आहे. म्हणून मी आबांचा कार्यकर्ता आहे, असे ही आवर्जून आपल्या प्रास्ताविकात सांगीतले.
यावेळी संभाजीतात्या आलदर म्हणाले, आबांचे कर्तुत्व आणि कार्य मोठे आहे. त्यामुळे आज सर्वपक्षीय सत्कार केला जातो आहे. सत्कारातून कार्याची पोचपावती आबांना मिळाली असल्याचे सांगत, मागील 30 वर्षाच्या कार्यकाळात आबांना मी जवळून पाहिले आहे. आबांकडे कामानिमित्त गेला नाही असा एकही कार्यकर्ता व नेता आणि पक्ष ही नाही. निवडणुकीचा काळ सोडला तर इतर वेळी सर्वपक्षीय नेते -कार्यकर्ते व सर्वसामान्य माणूस देखील प्रत्येक कामानिमित्त आबांकडे जातो हे तितकेच खरे आहे. टेंभू – म्हैसाळ सह अन्य विकास कामांमध्ये देखील आबांचे योगदान मोलाचे आहे. म्हणून आबा जीकडे तिकडे सत्ता हे समीकरण तालुक्याने पाहिले आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी आंदोलन मोर्चे काढले यामध्ये आबांनी देखील सक्रिय सहभाग घेतला आहे. म्हणून आज कोळा परिसर हिरवा गार दिसतोय. आबांनी निस्वार्थपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन कोळे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आबांचा सत्कार केला. आजचा सत्कार म्हणजे आबांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे. या निमित्ताने आबा हा कामाचा माणूस आहे. आबांची वेळ येईल तेव्हा सर्व कोळे ग्रामस्थांनी आबांचे कार्य एका दिलाने करावे असे आवाहन संभाजी तात्या आलदर यांनी केले.
यावेळी श्री. श्री. श्री. कोळेकर स्वामी महाराज यांनी चांगले कर्म केले तर दुःख निश्चित दूर होते. आणि चांगल्या कामाची पोहचपावती मिळतेच असे सांगत, माझा सर्वांना आशीर्वाद आहे. आज आबांची रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी निवड झाली त्यांच्या अभिनंदन आहे, परंतु मला अभिमान ही आहे मी त्या संस्थेचा विद्यार्थी आहे. असे ही त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमावेळी लहुजी कांबळे सर, स्वाती शिंदे पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड, मा. जि.प. अध्यक्षा जयामालाताई गायकवाड, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, मा. जी. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख, जेष्ठ नेते संभाजीतात्या आलदार, गजेंद्र कोळेकर, विलास देशमुख सर, डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील, प्रमोददादा साळुंखे पाटील, माजी नगरसेवक सचिन लोखंडे, माजी नगराध्यक्ष शिवाजीनाना बनकर, गुलाबराव बाबर, अमरदादा लोखंडे, विजय पवार, सागर मिसाळ, सूर्याजी खटकाळे, बाळासाहेब आसबे, अंगद जाधव, संतोष पाटील, अभिजीत कांबळे, राजाभाऊ गुजले, सरपंच दादासाहेब घाडगे, दिलीप मोठे, राजेंद्र पाटील, चंदन होनराव, कोळे गावचे सरपंच हरिभाऊ सरगर, उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, सिताराम सरगर, उद्धव कारंडे, मारुती सरगर सर, संदीप पाटील, किरण शेठ पांढरे, विठ्ठल बापू कोळेकर, कुंडलिक आलदर, राजेंद्र देशमुख, शिवाजी आलदर, बिरापंच आलदर, आबा आलदर, असलम पटेल, अकीब पटेल, संभाजी गोडसे, महादेव आलदर, महेश ओतारे, नामदेव आलदर, महादेव दिघे सर, ॲड. संपतराव पाटील, अशोक शिनगारे, डॉ. राज मिसाळ आदी उपस्थित होते.
चौकट
आबा जिकडे गुलाल तिकडे , मागील निवडणुकीत आबा आमच्याकडे नव्हते म्हणून गुलाल मिळाला नाही. यापुढे आबांनी मला आशीर्वाद द्यावा, अशी विनंती करीत, आबांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम मी अनुभवले आहे. कोणता कार्यक्रम न कोणती सभा न कार्यकर्त्यांशी संवाद अशा परिस्थितीत काकी आजारी असताना तब्बल दीड महिना आबा काकिंच्या पायाजवळ बसून होते. असा श्रावण बाळ मी आयुष्यात पाहिला नाही. यामुळे आबांसमोर दंडवत घालावा अशी भावना आहे. कार्यतपस्वी आम. काकासाहेब साळुंखे पाटील यांना विजयी करण्यामध्ये कोळे येथील देशमुख कुटुंबियांचे योगदान मोलाचे होते. साळुंखे पाटील आणि देशमुख कुटुंबियांचे विद्यानपिढ्यापासूनचे ऋणानुबंध आहेत. तो साळुंखे पाटील कुटुंबीयांनी जिव्हाळा जोपासला आहे. कोळे परिसरामध्ये पाणी आणण्यासाठी आबांनी दिलेले योगदान कोळे पंचक्रोशी विसरणार नाही.
ॲड. सचिन देशमुख
मा. जिल्हा परिषद सदस्य
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल सदस्य पदी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची निवड झाल्याबद्दल कोळे ग्रामस्थांनी गजी ढोलाचा ठेका -हलगीचा निनाद आणि फटाक्याच्या अतिषबाजीत कोळानगरीत धुमधडाक्यात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आबांचे जंगी स्वागत केले.
कोळ्याच्या अनेक वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा सत्कार समारंभ रविवारी पार पडला. फटाक्यांच्या आतिषबाजीबाजी गाजी ढोल, हलग्या, डिजिटल आणि ओसंडून वाहणारी नागरिकांची तुफान गर्दी यामध्ये कोळेकरांनी दिलेला भरभरून आशीर्वाद आणि प्रेमरुपी केलेल्या आबांच्या सत्कारामुळे सबंध तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे.