सांगोला न्यायालयात ई फायलिंग कार्यशाळा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी): जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये ई फायलिंग प्रणालीदवारे कामकाज सुरू झाले असुन सांगोला न्यायालयात सर्व विधिज्ञांकरीता ४ मार्च रोजी ई फायलिंग कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. सांगोला न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्रीमती एस. के. देशमुख, सह दिवाणी न्यायाधिश श्री. यु.एम. पाटील तिसरे सह दिवाणी न्यायाधिश श्रीमती के. बी. सोनवणे, सांगोला विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. धनंजय मेटकरी यांचे उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी प्रस्तावना सहायक सरकारी वकील अॅड. सारंग वांगीकर यांनी केली. मास्टर ट्रेनर अॅड. अयुब पटेल यांनी विधिज्ञांनी ई फायलिंगकरीता रजीस्ट्रेशन कसे करावे व पेपरलेस फायलिंग बाबत माहीती दिली व मास्टर ट्रेनर अॅड. नितीन बाबर यांनी केसेस ई फायलिंग प्रणालीदवारे कसे दाखल करावेत याची माहीती दिली. या कार्यशाळेस विधिज्ञांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून ई फायलिंग कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
यावेळी सांगोला विधिज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ व त्यांचे लिपीक उपस्थित होते. आभार प्रदर्शन अॅड. धनंजय मेटकरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेकरीता सहायक अधिक्षक आर. एम. किलजे, वरीष्ठ लिपीक डी.बी.राहीरकर, लिपीक टी.व्ही. वद्दी, लिपीक ए.एस. यादव तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.