पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स शाखा-सांगोला मध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचे मोठ्या थाटात उदघाटन संपन्न

सांगोला येथील पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स या जगप्रसिद्ध पेढीमध्ये दि.५ मार्च ते २० मार्च २०२३ हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन संपन्न होत आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन सौ.रूपमती साळुंखे-पाटील,सौ.रेखाताई पाटील व डॉ.सौ.निकिता देशमुख
यांच्या शुभ हस्ते रविवार दि.५ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले.
हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये अंगठी,बांगडी,नेकलेस,कर्णफुले व मंगळसूत्र इ. विविध मनमोहक सुबक व कलाकुसरीचे आकर्षक दागिने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे पाहून तिघीनींही समाधान व आनंद व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.मयूर क्षीरसागर यांनी केले तर मान्यवरांचे आभार सौ.शीला झपके यांनी मानले.सदर प्रसंगी पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स चे श्री.विलास(नाना) क्षिरसागर ,श्री.पी.सी.झपके सर,व्यवस्थापक श्री.महेश शिंदे व इतर मान्यवर उपस्तित होते.
सदर हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन ५ मार्च ते २० मार्च २०२३ या कालावधीमध्ये असुन दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% पर्यंत सूट मिळणार असलेने चोखंदळ ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ७०२८५००५०० या नंबरवर संपर्क करावा.