सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सीईटी २०२३ साठी क्रॅश कोर्स! आज दि.९ मार्च २०२३ पासून सुरुवात

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये सांगोला विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सीईटी २०२३ साठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे.
उद्या दि.९ मार्च २०२३ पासून या क्रॅश कोर्स ची सुरुवात करण्यात येणार आहे. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी प्रा.जालिंदर मिसाळ (९९७५४९११३२), प्रा. नागन्नाथ म्हमाणे (९१३०९०४२२१) यांच्याशी संपर्क करावा.व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांनी केले आहे.