मर्जीना साहेबहुसेन इनामदार हिची सरळसेवा तलाठी भरती 2023 मध्ये सोलापूर विभागातून निवड
मर्जीना साहेबहुसेन इनामदार हिची सरळसेवा तलाठी भरती 2023 मध्ये सोलापूर विभागातून निवड झाली आहे.
मर्जीना हिने रसायनशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जवळ्यात केंद्रात प्रथम क्रमांकाने झाले आहे. बारावीचे शिक्षण मुंबई येथे झाले असून पदवी सांगोला कॉलजे आणि पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ रसायनशास्त्र विभागातून A+ श्रेणीतून झालेले आहे.
याप्रसंगी लय भारी उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक श्री प्रमोद साळुंखे, साहील इनामदार, ऍड. मुक्तार इनामदार यांनी प्रत्यक्ष भेटून मर्जीनाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मर्जीना ही नोएडामध्ये कार्यरत असणाऱ्या अकाउंटंट जनरल जहांगीर इनामदार यांची पुतणी आहे.