उत्कर्ष विद्यालयाच्या छंद वर्गाच्या विद्यार्थ्यांनी घेतला अध्यात्मिक सहलीचा अनुभव

विद्यार्थ्यांनी आपल्या बालवयात आळस झटकून जर वेगाने काम केले तर आपण जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो असे मत छंद वर्गाच्या आध्यात्मिक सहलीच्या वेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापिका डॉ. शालिनीताई कुलकर्णी यांनी मांडले.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मधील छंद वर्गाची सहल ध्यान मंदिर सांगोला या ठिकाणी गेली होती त्या सहलीच्या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांनी समर्थांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग गोष्टीतून मुलांना सांगून दररोज शुभंकरोती म्हणणे व्यायाम करणे लेखन वाचन यासारख्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे असे मत त्यांनी समर्थांच्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी दररोज सूर्यनमस्कार व्यायाम करून आपले शरीर बळकट करावे असाही उपदेश मुलांना केला.
वरील कार्यक्रमाला ध्यान मंदिराचे साधक श्री राजू कुलकर्णी ,विठ्ठल गोडसे , संतोष सोनंदकर, मिलिंद पत्की व सुखानंद हळ्ळीसागर सर हे उपस्थित होते. या सर्व साधकांच्या वतीने छंद वर्गातील बालगोपाळांना खाऊ देण्यात आला.
या अध्यात्मिक सहलीला विद्यालयाच्या छंद वर्ग प्रमुख धनश्रीताई देशपांडे , संगीत शिक्षिका शुभांगी ताई कवठेकर व चित्रकला शिक्षिका मनिषा जांगळे या ही उपस्थित होत्या. अध्यात्मिक प्रसन्न वातावरणामुळे बालगोपाळांनी या सहलीचा आगळावेगळा मनमुराद आनंद घेतला .