जुनोनी येथील भागवत व्हनमाने यांना विधी शाखेचे पदवी प्रमाणपत्र प्रदान

सांगोला तालुक्यातील जुनोनी गावचे सुपुत्र मुंबई येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले श्री भागवत भीमराव व्हनमाने यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा, मुंबई. येथे दीक्षांत समारंभ कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतु आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते विधी शाखेची पदवी देऊन प्रमाणपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला.सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जुनोनी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेतलेले भागवत व्हनमाने सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्यरत असुन प्रामुख्याने त्याचे कर्तव्य पार पाडून तीन वर्षांत खडतर अशी विधी शाखेची इंग्रजी माध्यमाची पदवी प्राप्त केली आहे.दीक्षांत समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी आनंदराज आंबेडकर, डॉ आंबेडकर विधी महाविद्यालय प्राचार्य श्रीमती यशोधरा वरळे वडाळा मुंबई उपप्राचार्य सुभाष सोनकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पदवी प्रदान झाल्यामुळे जुनोनी काळूबाळूवाडी ग्रामस्थातून अभिनंदन कौतुक होत आहे.