*फॅबटेक इंजिनिअरींग मध्ये एक यशस्वी उद्योजकाकडून प्रेरणा सत्र या विषयावर कार्यशाळा संपन्न*
*सिव्हील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी व्यवसायाच्या अनेक संधी - प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे*

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, मधील सिव्हील विभागांतर्गत एक यशस्वी उद्योजकाकडून प्रेरणा सत्र या विषयावर संवादात्मक चर्चा आयोजित करण्यात आली होती. सिव्हील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली.त्यासाठी सिव्हील विभागांतर्गत एक यशस्वी उद्योजकाकडून प्रेरणा सत्र या विषयावर संवादात्मक चर्चा करण्यासाठी फॅबटेक सिव्हील इंजिनिअरींगचे माजी विद्यार्थी व गोवर्धन सल्लागार इंजिनिअर्स आणि कंत्राटदारचे संस्थापक श्री.धुळाप्पा.बी.बोरकर हे उपस्थित होते.
श्री. बोरकर म्हणाले, सिव्हील अभियांत्रिकी क्षेत्रातील उपलब्ध मार्गांचा वापर करून उद्योजक कसे व्हावे या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली . श्री. बोरकर हे या व्यवसायातील असल्याने त्यांनी व्यवसायातील त्यांचे वैयक्तिक अनुभव शेअर केले. इमारतींच्या बांधकामाशी संबंधित त्यांनी आपले वैयक्तिक अनुभव सांगितले. सिव्हील अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण ज्ञान आणि कौशल्यांचा परिचय करून देण्यासाठी उद्योजक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यवसायाच्या संधीत रूपांतर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. श्री. बोरकर यांच्या सादरीकरणाची पद्धत संवादात्मक होती आणि विद्यार्थ्यांनी विविध व्यवसाय संधींबद्दल त्यांच्या शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी बरेच प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या सर्व शंका व प्रश्नाची उत्तरे श्री. बोरकर यांनी दिली. या कार्यक्रमात सिव्हील अभियांत्रिकी विभागातील ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम संस्थेचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे,यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, डीन अँकँडमीक डॉ. वागीशा माथाडा,सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. माळी एस.एम., कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अमोल मेटकरी, प्रा.शरद आदलिंगे ,प्रा .विशाल भाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सूत्रसंचालन प्रा.सौ.सुजाता इंगोले यांनी केले.