जि. प. प्राथ. शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेमध्ये शिक्षण सप्ताह दिवस चौथा चैतन्यमय आणि आनंददायी वातावरणात साजरा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.जि. प. प्राथ शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. दिवस चौथा संस्कृतीक दिवस साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून कला व संस्कृतीच्या विविध उपक्रम घेण्यात आले . त्यामध्ये विविध भाषा, वेशभूषा, नृत्य, गाणी, नाट्य इत्यादी उपक्रम घेण्यात आले. तसेच मुलांनी वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवून आणले. मुलांबरोबर त्यांचे पालकही शाळेत कार्यक्रमाला उपस्थित होते.मुलांनी खुप आनंदाने आपली कला सादर केली.

सर्व मुले खुप उत्साहाने सर्व उपक्रमात सहभागी झाले.त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला व चैतन्यमय व आनंददायी वातावरणात दिवस साजरा करण्यात आला.त्यासाठी केंद्रप्रमुख सौ. जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती.जिरगेमॅडम व उपशिक्षिका सौ. पिरजादेमॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.