आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताहास उत्साहात प्रारंभ”

आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून या सप्ताहाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सुरुवात अध्ययन अध्यापन साहित्य या उपक्रमाने झाली सदरच्या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध तक्ते ,चित्रे ,विविध प्राणी व पक्ष्यांचे मुखवटे बनवले त्याचबरोबर आव्हानात्मक कार्ड बनवले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वाचनाचे गोडी लागावी म्हणून वाचन घेण्यात आले.
सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत गणिती प्रतिज्ञा घेण्यात आली व गणितीय खेळ घेण्यात आले .शासनाकडून उपलब्ध झालेल्या पीएसई कीटच्या सहाय्यने विविध गणितीय कोडी विद्यार्थ्यांनी सोडवली ,गणितीय खेळ, गणितीय गाणी इत्यादी गणितीय उपक्रम राबवले .
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.या उपक्रमांतर्गत देशी खेळाचे महत्त्व व व्यायाम घेण्यात आला तसेच लंगडी, लगोरी , सागरगोटे , शर्यत ,फुगडी, आंधळी कोशिंबीर, दोरीवरच्या उड्या इत्यादी खेळाचा आनंद मुलांनी घेतला.
सदरच्या या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे सर ,श्रीमती सुलेखा केदार मॅडम, श्री विशाल होवाळ सर,सौ.मयुरी नवले मॅडम सौ.जयश्री वाघमोडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.