न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण सप्ताहातील सांस्कृतिक दिवस उत्साहात साजरा

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून सप्ताहाचा चौथा दिवस बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर,प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम यांनी सांस्कृतिक दिनाची माहिती सांगितली. सकाळच्या सत्रामध्ये पाककला,चित्रकला आणि हस्तकला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.या मध्ये वेशभूषा,लोकनृत्य,लावणीनृत्य,पो वाडा ,देशभक्तीपर गीत यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.
सदरच्या उपक्रमासाठी प्रशालेतील सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम, वैशाली घोडके मॅडम, श्रीरंग बंडगर सर,श्रीपती वगरे सर, कविता पाटील मॅडम, कोमल भंडारे मॅडम, स्मिता देशमुख मॅडम, शुभांगी बनसोडे मॅडम, सायली खडतरे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.