चारा छावणीचे मंजूर अनुदान तात्काळ छावणी चालकांना अदा करावे ; मदत व पुनर्वसन खात्यांचे प्रधान सचिव यांच्याकडे दिपकआबांची मागणी

सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे 214 चारा छावणी चालकांचे 36 कोटी रुपयांचे अनुदान याबाबत राज्याच्या वित्त विभागाशी पत्रव्यवहार करून राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने छावणी चालकांना अदा करावे. अशी मागणी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.
२०१८-१९ मधे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. सदरच्या चारा छावण्या बंद होऊन सुमारे चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तरीही, चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाने न दिल्याने चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून छावणी चालकांच्या रखडलेल्या अनुदानाची फाईल पुन्हा उघडून याबाबत चौकशी समिती नेमून समितीच्या अहवालानुसार सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील २१४ छावणी चालकांना सुमारे ३६ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. छावणी चालकांसाठी मंजूर असणारे अनुदान राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने वित्त विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा करून तात्काळ सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांना अदर करावे. या मागणीसाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह चारा छावणी चालकांची शिष्टमंडळ यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच या खात्याच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. यावेळी छावणी चालक संघटनेच्या शिष्टमंडळातील प्रवीण नवले, विनायक मिसाळ, कैलास माळी, अनिल पाटील आदी छावणी चालक उपस्थित होते.
——————————————————————–
१) छावणी चालकांच्या खात्यावर अनुदान जमा होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार
सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मिळावे म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून छावणी चालक शिष्टमंडळासोबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मंजूर असले तरीही प्रत्यक्ष छावणी चालकांची प्रलंबित अनुदान आणि शासनाकडे त्यांची असलेली डिपॉझिट छावणी चालकांच्या खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
——————————————————————–