सांगोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे

सांगोला शहरातील रस्त्यांवर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांचा खड्डे चुकविण्याच्या नादामध्ये अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत तर शहरातील अनेक प्रभागातील रस्ते चिखलमय व खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसह व पादचार्‍यांना ये-जा करणेही अवघड झाले आहे नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे सांगोला शहरवासियांना खड्डेमय व चिखल युक्त रस्ते तुडवत घर व कार्यालय गाठावे लागत आहे त्यामुळे सांगोला शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मधील रस्ते चांगले म्हणण्याची वेळ आली आहे.

सांगोला नगरपालिकेला शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्याची थातुरमातुर दुरुस्ती करण्यातच सांगोला नगरपालिका प्रशासन विभागातील अधिकारी धन्यता मानत आहेत. नगरपालिकेने पावसाळा होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असतानाही याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. वाहन चालक गंभीर जखमी होत असून या अपघात संदर्भात कोठेही नोंद नाही तसेच पाऊस पडल्यानंतर सांगोला शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांवर चिखल व खड्डे झाल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सांगोला शहरातील नागरिकांनी शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करून ही याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून अर्धा पावसाळा संपला तरी शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button