भुईटे – केदार शुभ विवाह संपन्न

सांगोला- शहरातील खारवटवाडी येथील पांडुरंग भानुदास भुईटे यांची पुतणी व शिवाजीराव भानुदास भुईटे यांची सुकन्या चि.सौ.कां. तृप्ती व खारवट वाडी येथील मधुकर रामचंद्र केदार यांचे पुतणे व जालिंदर रामचंद्र केदार यांचे सुपुत्र चि.अभिजित यांचा शुभ विवाह नुकताच संपन्न झाला. सांगोला शहरातील वाढेगाव रोड वरील रामकृष्ण व्हिला,गार्डन या ठिकाणी सदर विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी वधूवरास शुभेच्छा देण्यासाठी सांगोला शहरातील राजकीय,शैक्षणिक,सामाजिक,कृषी,विधी क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप तर्फे वधू वराना शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यप्रमुख या नात्याने पांडुरंग भुईटे व मधुकर केदार यांचा ज्येष्ठ ग्रुप सदस्य चंद्रशेखर अंकलगी व शंकरराव सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button