sangola

बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने पदाची सेवा पुरविणाऱ्या बेरोजगार सेवासुस्थांना मुदतवाढ

HTML img Tag Simply Easy Learning    

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयात 6 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने पदाची सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगार सेवासुस्थांकडून सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी अकुशल 2 शिपाई उपलब्ध करून देण्याकरिता दरपत्रक मागविण्यात आले होते, ते विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यामुळे परत दरपत्रक सादर करण्यासाठी बेरोजगार सेवासंस्थाना 7 दिवसाची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी दिली आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णयानुसार दि 11 डिसेंबर 2015 मधील अटी व शतींची पूर्तता करणाऱ्या व पदांची सेवा पुरविण्यास इच्छुक असणाऱ्या बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक व इच्छापत्र सदरची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांच्या आत कार्यालयास सादर करावे असे आवाहन जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पार्क चौक, नॉर्थकोट, सोलापूर-413001 येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक.0217-2992956 द्वारे संपर्क साधवा

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!