सांगोला महाविद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : येथील सांगोला महाविद्यालया मध्ये १ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रारंभी क्रीडांगण स्वच्छ केले. क्रीडांगणावर असलेले गवत काढून ते नष्ट करण्यात आले तसेच क्रीडांगणावरील वृक्षांना आळी करण्यात आली. तसेच या प्रसंगी सांगोला महाविद्यालायचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देताना सांगितले की स्वच्छता व आरोग्य याचा जवळचा संबंध असून सर्वांनी आपापल्या परीने स्वच्छते विषयी काळजी घेतली पाहिजे. आपण जर स्वच्छता पाळली तर एक प्रकारे आपण सर्व देश सेवाच करत असतो असे ही ते म्हणाले.
हा उपक्रम कार्यक्रम अधिकारी राबविण्यासाठी डॉ नवनाथ शिंदे व डॉ सदाशिव देवकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना समितीतील डॉ. प्रकाश पाटील, प्रा. वासुदेव वलेकर, डॉ. रमेश टेंभूर्णे, डॉ. भारत पवार , डॉ. मालोजी जगताप, डॉ. सौ. विद्या जाधव, प्रा. सौ. सोनाली भुंजे इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामध्ये प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामध्ये एकूण १९० विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.