सांगोला विद्यामंदिरच्या यशराज तारेची कॅरम क्रीडा स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर निवड

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी यशराज तारे याची जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगट मुलांमध्ये पुणे विभागीय स्तरासाठी निवड झाली.
या यशस्वी खेळाडूचा संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे ,मच्छिंद्र इंगोले व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
वरील यशस्वी खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा. डी.के पाटील, प्रा. संतोष लवटे ,नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर,स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button