सांगोला तालुका

श्री चौंडेश्वरी महिला मंचाच्या वतीने  आगळावेगळा माहेरचा आहेर.

श्री चौंडेश्वरी महिला मंच, नवरात्र उत्सव समिती, पुरुष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ता 19/10/2023 रोजी ठीक सकाळी 11 वा . श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी गल्ली, सांगोला येथे सांगोल्यातील लेकी ज्या सासरी गेली आहेत. त्यांच्यासाठी माहेरचा आहेर हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.
     या कार्यक्रमाला देवांग कोष्टी  समाजातील माहेरवाशीनिणा बोलवण्यात आले होते. त्यांना श्री चौंडेश्वरी देवीला नेसवलेली साडी, चोळी  असा माहेरचा आहेर देऊन या शारदीय नवरात्र उत्सवात स्त्रीचा खऱ्या अर्थाने सन्मान केला.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल लाटणे सरांनी केले. तसेच सूत्रसंचालन महिला मंचाच्या अध्यक्षा सौ लता कांबळे यांनी.
    कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लेकी आल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमाचे शोभा खूपच वाढली. प्रत्येकीने आपले मनोगत व्यक्त केले. त्यांना माहेरला येण्याचे एक निमित्त मिळाले होते. त्यांना जुने दिवस आठवले बालपणीचे दिवस आठवले जुन्या मैत्रिणी भेटल्या त्यामुळे त्यांचा गेट-टुगेदर झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
     असा आगळावेगळा कार्यक्रम घेतल्यामुळे त्यांनी देवांग कोष्टी  समाजाचे तसेच महिला मंचाचे आभार मानले.
    या कार्यक्रमासाठी पुरुष संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच महिला मंचाच्या पदाधिकारी संचलिका यांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमात सर्वांसाठी अल्पोपार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आभार सौ स्वाती तारळेकर यांनी केले. सांगोल्याच्या लेकी आनंदाने आपल्या सासरी गेल्या आणि कार्यक्रम अगदी आनंदाने पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!