कोळा परिसरात गावाला विमानाच्या दहा घिरट्यांनी घबराट पसरली….

सांगोला तालुक्यातील कोळा कोळा डोंगर पाचेगाव गौडवाडी या परिसरात भागात आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून विमानाने सुमारे ता १० घिरट्या घातल्या प्रमाणापेक्षा कमी उंचीवरून विमानाने घिरट्या घातल्याने नागरिकात भितीचे वातावरण झाले. सुमारे दोन तासाहून अधिक काळ कमी उंचीवरून फेऱ्या मारणाऱ्या विमाना बाबतची भिती आणि मोठी उत्सुकता कोळे ग्रामस्थांनी अनुभवली.सदरचे विमान बारामती येथील प्रशिक्षण केंद्राचे असल्याची माहिती समोर आली आहे.
कोळे गावठाण भागात महादेव मंदिर कोळेकर महाराज मठ लक्ष्मी मंदिर या ठिकाणी प्रमाणापेक्षा कमी उंचीवरून विमानाच्या घिरट्या घालण्याच्या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती  पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने उडणाऱ्या विमानाचे सर्वप्रथम दर्शन झाले. विमान पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडले मोठ मोठ्याने आवाज येत होता. त्यानंतर मात्र हे विमान अवघ्या ५ ते ७ मिनिटांच्या फरकाने पूर्व-पश्चिम अशा येरझाऱ्या मारू लागले. सुमारे दोन तास कमी उंचीवरून उड्डाण करणाऱ्या या विमानाने भितीदायक वाटणाऱ्या दिवसभरात संपूर्ण गावाला वेढा घालून जवळपास दहा घिरट्या घातल्या. त्याची माहिती घेण्यासाठी अनेकांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केला परंतु ठोस माहिती मिळू शकली नाही सोलापुर येथे असलेल्या विमानतळावरून काही प्रशिक्षीत पायलट हे विमान उडवत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती.
त्यानंतर सदरचे विमान बारामती येथील प्रशिक्षण केंद्रातील असल्याची माहिती मिळाली.विमानांना पाहण्यासाठी अबालवृध्दांनी घराबाहेर येवुन ठाण मांडले, तर अनेकांनी हा नेमका प्रकार काय आहे, याची विचारणा सुरू केली. मुळात कोळे गावात व भागात इतिहासात असे कमी उंचीवरून विमानांनी कधीच घिरट्या घातल्या नाहीत, त्यामुळे हा प्रकार केले.भितीदायकच ठरला. सकाळच्या सत्रात विमानाने घातलेल्या घिरठ्यामुळे भीतीमध्ये वाढच झाली. दरम्यान बारामती येथील प्रशिक्षण केंद्राची शिकाऊ विमाने आहेत असे माहिती प्रशासनाकडून मिळाली सदरचे लहान विमान प्रशिक्षणाचे असून बारामती येथील प्रशिक्षण केंद्राची असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button