कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा येथे इयत्ता बारावी टॉपर्स विद्यार्थी – पालक- शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न…

कोळा – कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळा येथे इयत्ता बारावी टॉपर्स विद्यार्थी, पालक, शिक्षक सहविचार सभेचे आयोजन शनिवार दिनांक 27/07/2024 रोजी करण्यात आले सदर सभेची सुरुवात पालक पांडुरंग सरगर, भगवान बिले, प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, पर्यवेक्षक श्री चारुदत्त जगताप सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती पूजनाने केली सदर सभेचे औचित्य साधून ज्युनिअर कॉलेजची माजी विद्यार्थ्यांनी कु. सरस्वती नरळे हिची कोल्हापूर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा देवून सत्कार करण्यात आला
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री श्रीकांत लांडगे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येयनिश्चिती करावी, निश्चित केलेले ध्येय सत्यात उतरवण्यासाठी कष्ट, परिश्रम घ्यावे. कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर यश आपोआप मिळते.तसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन केले. पर्यवेक्षक श्री चारुदत्त जगताप सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना या विषयी मौलिक मार्गदर्शन केले तसेच सेल्फ स्टडी वर जास्तीत जास्त भर द्यावा असे सांगितले
पालकांच्या वतीने श्री दत्तात्रय हातेकर, डॉ. पांडुरंग सरगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कला शाखेच्या वतीने प्रा. आनंदा आलदर सर तर शास्त्र शाखेच्या वतीने प्रा. मारुती श्रीराम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  तसेच प्रास्ताविक व टॉपर्स योजनेचे महत्त्व प्रा. तानाजी सरगर सर यांनी सांगितले, सूत्रसंचालन प्रा. अमोल कोरे सर यांनी केले व आभारप्रदर्शन प्रा.अंकुश सरगर सर यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa