जिथे भाव तिथे देव – गुरुवर्य भालचंद्र पाटील काका

मनी नाही भाव आणि देवा मला पाव तर असे न करता परमेश्वराची भक्ती करताना निष्ठेने करा म्हणजे जिथे भाव आहे तिथे देव आहे व भक्ती करीत असताना गुरुचरित्र कथासार, राम विजय, हरी विजय अशा ग्रंथांचा अभ्यास करा व गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांचे वास्तव्य मोराळला आहे व तिथे देवाचा संवाद होतो व यासाठी मोराळला एक वेळ भेट द्या असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी दिघंची ता. आटपाडी येथे प्रबोधनात सांगितले.
जगी सुखी असा कोणी नाही व पायात पाय घालणारी माणसे ही आपलीच आहेत व यातून आसूरी शक्तीचा चा त्रास होत आहे व त्यामुळे त्यांना नावे न ठेवता, संकट कोणतेही असू द्या ते भक्तिमार्गाने दूर होईल व संकटातून श्री दत्तगुरू बाहेर काढतील कारण ब्रह्मा, विष्णू व महेश अश्या तिन्हींचा अवतार दत्त महाराज आहेत परंतु सर्वांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे तसेच भक्ती करीत असताना सकाळी व संध्याकाळी दोन अगरबत्ती लावून दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री दत्त, श्रीदत्त असा उदबत्ती संपेपर्यंत जप करा व भक्ती करीत असताना श्री दत्त महाराजांना शरण जावा व यासाठी गुरुचरित्र वाचा त्यातून एक परीट राजा कसा झाला व विधवेस परत सौभाग्य कसे प्राप्त झाले हे समजेल यासाठी ग्रंथांचा अभ्यास करा.

शिवदत्त महाराजांचा महिमा त्यांची आरती सुरू झाल्यावर सर्वांना प्रत्यय आला त्यामुळे शिवदत्त दत्तरूपीच आहेत तसेच आत्महत्या करू नका व आपले प्रश्न सोडवण्यासाठी संतोष उर्फ बंडू दादा पाटील यांची वेळ मागून घेऊन अडचण सोडवा व लवकरच मोराळे येथे नियोजित भव्यदिव्य असे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचे मंदिर उभारणार आहे व हे मंदिर भक्तांच्या सहकार्याने उभारणार आहे तरी त्यासाठी सर्वांनी मदत करून सहकार्य करा असे आवाहनही गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी यावेळी केले. सदर प्रसंगी चंद्रकांत शेटे, संदीप सावंत, धनाजी बोडरे, हरिदास शिनगारे, शहाजी शिनगारे, स्वप्निल शीलवंत, आनंद बोराटे, राजेंद्र शिनगारे, ग्रामस्थ, सेवेकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



