जि. प. प्राथ. शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेमध्ये शिक्षण सप्ताहाची स्नेहभोजनाने सांगता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.जि. प. प्राथ शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. दिवस सातवा समुदाय सहभाग दिवस या दिवसा अंतर्गत विद्याजली पोर्टल वर शाळेची नोंदणी करणे, विविध शैक्षणिक घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.
शाळा व समाज यांच्यातील नाते घट्ट होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्या माध्यमातून मुलांना स्नेहभोजन देण्यात आले. यासाठी शाळेतील सर्व सदस्य, पालक यांनी सहकार्य केले. मुलांनी भोजनाचा आनंद घेतला व या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. त्यासाठी केंद्रप्रमुख सौ. जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सर्व पालकांनी मोलाचे सहकार्य केले. मुख्याध्यापिका श्रीमती.जिरगे मॅडम व उपशिक्षिका सौ. पिरजादे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले