” आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताह स्नेहभोजन करून उत्साहात संपन्न “

आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताह स्नेहभोजन करून उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भारत देशातील सर्व शाळांमध्ये २२ जुलै ते २८ जुलै हा शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्रित शिक्षण मंत्रालयामार्फत सूचित करण्यात आले होते.
या अनुषंगाने आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह दिलेल्या परिपत्रकानुसार उत्साहात संपन्न झाला .तसेच २८ जुलै रोजी सप्ताहातील शेवटचा दिवस स्नेहभोजनाने संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी तसेच सचिव श्री लक्ष्मण गवळी सर, श्री एम .डी. बनकर सर,श्री .प्रभाकर फुले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे सर, श्रीमती सुलेखा केदार मॅडम ,सौ.अनिता माने मॅडम ,श्री विशाल होवाळ सर ,सौ. मयुरी नवले मॅडम, सौ. जयश्री वाघमोडे मॅडम,सौ. शितल माळी मॅडम व विद्यार्थी या सर्वांनी स्नेहभोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.