वाढेगांव प्रशालेत “शिक्षण सप्ताह” उत्साहात साजरा

सांगोला/प्रतिनिधी:: वाढेगांव ता.सांगोला येथील प पू उदयसिंहजी देशमुख प्रशालेत दी.२२ जुलै ते २८ जुलै दरम्यान “शिक्षण सप्ताह” मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. तर सर्वच उपक्रमामध्ये ग्रामस्थ, पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या अंगी शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे,विज्ञान,तंत्रज्ञान, डिजीटलायजेशन,वृक्ष लागवड व संवर्धन, वाचन ,लेखन,क्रीडा,कला व उपक्रमशीलता या गुणांचा विकास साधणे, व्यवसायातील नावे तंत्रज्ञान व त्याचा विकास करणे. याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या कला गुणांना वाव देणे.यासाठी दिनांक २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान प्रत्येक दिवस नाविन्य पूर्ण असा साजरा करण्यात आला. यामध्ये वृक्ष लागवड मतदान नोंदणी व जनजागृती, वाचन लेखन वक्तृत्व यासह त्यांच्यातील क्रीडा व कला गुण गुणांना विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षण सप्ताह राबविण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व ग्रामस्थ यांनी सहभाग घेऊन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी तिथी भोजनाचे आयोजन करीत समुदाय सहभाग वाढवून शिक्षण सप्ताहाचा सांगता समारोह करण्यात आला
या सप्ताहाच्या निमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष बालाजी केदार, केंद्रप्रमुख एम एस मठपती, वाढेगाव ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच उपसरपंच व सदस्य या सर्वांनीच सहभाग नोंदवून शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी मदत केली.