निरा देवघर प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करावा; खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची जलसंसाधन विकास मंत्री मा.श्री.सी.आर.पाटील यांच्याकडे मागणी

निरा देवघर प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत जल संसाधन विकास मंत्री मा.श्री सी.आर.पाटील यांची खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट घेतली..
निरा देवघर प्रकल्प 2007 साली पूर्ण झाला. मात्र अद्यापही या प्रकल्पाचे वितरण जाळे अपूर्ण राहिलेले आहे.परिणामी माढा मतदारसंघातील अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या माळशिरस फलटण तालुक्यातील अंदाजे २५००० हेक्टरला अपेक्षित सिंचन लाभ मिळालेला नाही.तसेच आज आखेर पर्यंत पंतप्रधान कृषी सिंचन योजना व जलसंसाधन विकास मंत्रालयाकडून निधी प्राप्त झालेला नाही.
तरी निरा देवघर प्रकल्पाला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करून अपूर्ण कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जलसंसाधन विकास मंत्री मा.श्री.सी.आर.पाटील यांच्याकडे विनंती केली