स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्वप्नातील सांगोला शहाजीबापूंच्या साथीने साकार करणार ; ड्रोन सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी दिपकआबांचा निर्धार

 

 

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडणाऱ्या आणि पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम सांगोला तालुका आपण आमदार शहाजीबापू पाटील यांच्या साथीने साकार करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. सोमवार दि.२९ जुलै रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना ड्रोन सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, नैसर्गिकरित्या सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका आहे. त्यातच प्रत्येक सिंचन योजनेच्या टेलला हा तालुका असल्याने सांगोला तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी आणणे हे मोठे आव्हान आहे. परंतु, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल करण्याचे स्वप्न स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सर्वात प्रथम पाहिले आणि शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा केली. त्यांच्याच परिवर्तनवादी विचारांचा वारसा घेऊन आणि गत विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील जनतेला आमदार शहाजी बापू पाटील आणि मी एकत्रित दिलेल्या आश्वासनाला स्मरून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचा दिवस उजडावा या हेतूने आम्ही दोघेही गेली ३०-३५ वर्षे आहोरत्र प्रयत्न करत आहोत. टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, त्याचबरोबर नीरा उजवा कालवा तथा सांगोला शाखा कालवा यांसह जिहे काठापूर योजना आणि नुकतीच पुन्हा एकदा मूर्त स्वरूप घेत असलेली उजनी उपसा सिंचन योजना तथा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही दोघेही सदैव आग्रही राहू. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपण स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारांशी बांधील राहून सदैव शेतकऱ्यांच्या हिताचीच भूमिका घेऊ असा विश्वासही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button