तालुक्याचा विकास करण्यासाठी संधी द्या-आमदार शहाजी बापू पाटील
बलवडी येथे रविराज शिंदे यांचा वाढदिवस साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा पवार यांचे विकास कामाचे पर्व सुरू असून, आज मुख्यमंत्री यांच्या कृपेने सांगोला तालुक्यास विक्रमी निधी मिळाला असून, टेंभू, मैशाळ, बरोबर उजनीचे पाणी मिळणार असून शेतीच्या पाण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी एकही गाव वंचित राहणार नाही व यासाठी महायुती सरकारने केलेले काम सांगोला तालुक्यात विसरता येणार नाही व येथून पुढेही विकास करण्यासाठी एकजूट ठेवून विकासाची चळवळ पुढे तेवत ठेवण्यासाठी संधी द्या असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी बलवडी ता. सांगोला येथे युवा नेते रविराज शिंदे यांच्या वाढदिवस सत्कार समारंभात व्यक्त केले.
विजय दादा शिंदे व रमेश शिंदे या शिंदे बंधूंचे व माझे नाते वेगळे असून, त्यांचे योगदान मोठे आहे तसेच आज रवीचा वाढदिवस व त्याची उपसरपंच निवड म्हणजे खऱ्या अर्थाने प्रथम गावाचे अभिनंदन व रवीचे अभिनंदन, यापुढे नेता मोठा नसतो तर पाठबळ देणारा मोठा असतो असे पाठबळ सर्व गावाने रवीच दिले तर अहंकार न बाळगता तळागाळातल्या माणसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा असा सल्लाही यावेळी बापूंनी दिला. सुरुवातीस प्रास्ताविक महादेव शिंदे यांनी केले तर रविराज शिंदे यांचा व आमदार शहाजी बापू पाटील यांचा संयुक्त हार घालून मान्यवरांच्या हस्ते व अनेक संस्था, युवा वर्ग, ग्रामस्थ व मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
मला प्रथम उपसरपंच पद करणे कामी विजयदादा, रमेश गुरुजी व मीनाताई मॅडम यांची मोठी योगदान आहे असे माजी उपसरपंच समाधान शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर आपण आजपर्यंत जातीपातीचे राजकारण न करता गावाची सेवा केली व यावेळी जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही हे समजले व रवी व समाधान यापैकी प्रथम कोणास उपसरपंच करायचे परंतु राजकारण करताना एक पाऊल मागे सरावे लागते हे सांगून समाधान यास प्रथम पद दिले व आज शेतीसाठी वेळोवेळी बापूंनी मानधित पाणी सोडले व त्यामुळे येथील शेती बापू मुळे आहे व बापू म्हणजे विकासाचा महामेरू आहे तसेच यापुढे आपण बापूची साथ सोडणार नाही असे मत माजी सरपंच विजयदादा शिंदे यांनी व्यक्त केले. तर रवी व अजिंक्य श्रीराम लखन जोडी असून, त्यांना विजय दादा यांनी मार्गदर्शन करावे असे मत शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांनी यावेळी सांगितले. टेंभूच्या पाण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांचे मोठी योगदान असून मान नदीत पाणी त्यांच्यामुळे आले असे मत शिवसेना नेते दादासो वाघमोडे यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या निवडीबद्दल सर्व ज्येष्ठ मंडळींचे व ग्रामस्थांचे आभार मानतो असे मत सत्कारमूर्ती उपसरपंच रविराज शिंदे यांनी व्यक्त केले.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष आनंद भाऊ माने, माजी सरपंच प्रसाद शिंदे, सौ. सुषमाताई शिंदे, महादेव पवार, सूर्योदय उद्योगाचे प्रमुख अनिल भाऊ इंगवले, शिक्षक नेते जगन्नाथ भगत, सूर्यकांत शिंदे, दत्तात्रय कारंडे, चेअरमन भिकाजी बाबर, दगडू बाबर, चोपडीचे उपसरपंच पोपट शेठ यादव, ग्राम. सदस्य दिनेश बाबर, शिवराम शेठ गिड्डे, प्रा. संजय देशमुख, सुनील भोरे, डी के पाटील, अमोलजी नलवडे, आबासाहेब बाबर, सरपंच माऊली राऊत, माजी उपसरपंच विकास मोहिते, गणेश कमले, शिवसेना नेते साहेबराव शिंदे, सोसायटी व्हॉइस चेअरमन मन्सूर शेख, शाळा समिती अध्यक्ष बाळासो खुळपे, आबासाहेब बाबर, मुख्याध्यापिका आर. डी. कोडग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी सेना अध्यक्ष अजिंक्य शिंदे, स्वप्निल शिंदे, पवन राजे शिंदे, शिंदे परिवार, ग्रामस्थ, मित्र मंडळ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिक्षक तात्यासो शिंदे यांनी मानले.