कोळा गावचे शेकापचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचे निधन…

सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हा चेअरमन विलासराव देशमुख सर यांचे दुःखद निधन झाले निधना समयी त्यांचे वय ७९ होते. निधनाने संपूर्ण कोळेगाव शोक सागरात बुडाला गाव बंद दुःख व्यक्त करण्यात आले. निधनाने सर्वत्र व्यक्त होत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय स्व आ भाई गणपतराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू , जमिनीवर राहून सर्वांना आपुलकीने बोलणारे अत्यंत कणखर व काळजीवाहू नेतृत्व, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे , आपुलकीने प्रत्येकाचे विचारपूस करणारे,खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन व खरेदी-विक्री संघाचे जवळजवळ ३५ वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून ज्यांनी काम पाहिले असे कोळे गावचे विश्वासू नेतृत्व देशमुख सर होत विद्या मंदिर कोळा येथे शिक्षक म्हणून बरेच वर्ष काम करून सेवानिवृत्त झाले यांच्या जाण्याने कोळे गावाची फार मोठी राजकीय हानी झालेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी मार्केटचे प्रभारी उपअभियंता सतीश देशमुख प्रगतशील शेतकरी प्रमोद देशमुख उदय देशमुख सर यांचे वडील होत.
विलासराव देशमुख सर यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख मारुती आबा बनकर बाळासाहेब एरंडे यांच्यासह सर्व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता करगणी रोडवरील कोळा येथे स्मशानभूमीत होणार आहे..