मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सांगोल्यात ४२ हजार महिलांची नोंदणी – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, याकरिता प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे सांगोला तालुक्यात आजपर्यंत ४२ हजारांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे. तालुक्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी असल्याची अधिकाधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्या.

सांगोल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी अर्ज अपलोड करणे, कागदपत्रांची छाननी, तसेच लाभार्थीची यादी प्रसिद्ध करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले. सांगोला तालुक्यात आजपर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन असे ४२ हजारांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार, प्रसिद्धीमुळे, तसेच प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत सांगोला तालुक्यात महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्यापही सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून संकलन करण्यात येत आहेत. सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेचा सांगोला तालुक्यातील अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीला सदस्य सचिव तथा तहसीलदार संतोष कणसे, सदस्य मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर पश्चिम वर्षा पाटील, निवडणूक नायब तहसिलदार शुभांगी जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) एस.एस. चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद सावंत, अव्वल कारकून मिलिंद पेठकर, अशासकीय सदस्यपदी डॉ.पियूष साळुंखे पाटील व शिवाजी गायकवाड,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेनाळ, विस्तार अधिकारी वसंत फुले, ए.यु. तोडकरी, एस. एस.पारसे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button