प्रा.आर.एस.गायकवाड यांची प्राचार्यपदी निवड

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.आर.एस.गायकवाड यांची दलितमित्र कदम गुरूजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा येथे प्राचार्य पदावर नियुक्ती झाली आहे.
आज गुरूवार दि.1 ऑगस्ट रोजी हे प्राचार्य पदाचा पदभार स्विकारणार आहेत. डॉ.गायकवाड हे 1992 पासून डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागप्रमुख कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख, सचिव श्री.विठ्ठलराव शिंदे, प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी यांच्यासह सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले.