स्व.बाळासाहेब तेली यांच्या विषयी……..

सांगोला शहरातील बाळासाहेब तेली यांचे आज दुपारी निधन झाले. बाळासाहेब तेली हे सांगोल्यातील तेलाचे आणि किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी होते तसेच ते माळकरी आणि निष्ठावंत वारकरी होते .
त्यांना व्यायामाची व योगासनाची आवड होती . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते आपले वडील दगडू तेली यांच्या हाता खाली कष्ट करून नावलौकिक मिळाविला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात सचोटीने धंदा करून प्रगती केली. ग्राहकांचा विश्वास संपादन केला. गोरगरिबांना सहकार्य केले. ते विठ्ठल भक्त होते ज्ञानेश्वरांच्या पालखीत त्यांनी 25 वर्षे पायी वारी केली होती. सांगोल्यांमध्ये तेली गल्लीतील भजनी मंडळ त्यांनी दीर्घकाळ चालविले होते. दर श्रावणात सकाळी ते दिंडी काढत असत . त्यांना अनेक अभंग पाठ होते .त्यांना गायनाचे चांगले अंग होते .अनेक भक्तांना त्यांनी भजन शिकविले. हरिभक्त परायण अशी पदवी त्यांना चैतन्य हास्य योग मंडळातील जाणकारांनी दिली होती.
त्यांना योगासनाची आवड होती दररोज ते सकाळी सहा वाजता नियमितपणे राणोजी बुवाच्या मंदिरात योगासनासाठी उपस्थित राहत. अनेक वर्षे त्यांनी योगासने घेतली होती .सर्वांना प्रेमाने वागवणारे , हसत खेळत राहणारे, माणसांना जीव लावणारे , ह. भ. प.बाळासाहेब तेली उर्फ अण्णा यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखात मी डॉक्टर कृष्णा इंगोले चैतन्य अशोक मंडळाचे अध्यक्ष डी. डी. जगताप व सर्व पदाधिकारी आणि सहकारी सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.
डॉक्टर कृष्णा इंगोले