बाळासाहेब तेली यांच्या जाण्याने निर्माण झालेले काही प्रश्न…

सांगोला:- सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिक,प्रसिद्ध व्यापारी व अध्यात्म व धार्मिक क्षेत्रातील जाणकार बाळासाहेब तेली यांच्या अपघाती जाण्याने सांगोला शहरातील दुरवस्था व एकुणच कारभार याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.
बाळासाहेब हे चैतन्य हास्य क्लबचे नियमित सद्स्य असल्याने ते दररोज सकाळी बरोब्बर पावणे सहा ते सहा या वेळेमध्ये दुचाकीवर क्लब मध्ये जात असत .शनिवार दिनांक 20 जुलै रोजी क्लब मध्ये जात असताना रस्त्यावर मोकाट पणे ठाण मांडणार्या व रस्त्यात मधोमध उभे ठाकलेल्या गायिच्या कळपा मुळे त्यांची दुचाकी गायीस धडकुन ते रस्त्यात डोक्यावर पडले व मेंदुस मार लागल्याने ते बेशुद्ध झाल्याचे व नंतर बुधवारी गेल्याचे समजले.त्यांच्या या अशा जाण्याने बर्याच प्रश्नाना वाचा फुटली आहे.
सध्या गेल्या काही वर्षा पासून सांगोला शहरात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.कुत्री वेगात एकमेकांचा पाठलाग करताना वेगात रस्त्याच्या मधून धावत असतात.
मोकाट जनावरे रस्त्यात मधोमध ठाण मांडून बसलेले असतात किंवा उभी असतात.आवजड वाहने,वेगात धावणारी तरुणाई व शाळेचे विद्यार्थी या मुळे ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालविणे धोकादायक ठरू लागले आहे.अशा त्रुटी मुळे लहान मोठे अपघात हौण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
रस्त्यातील खड्डे,स्पीड ब्रेकरची संख्या,अरुंद रस्ते,मोकाट जनावरे या गोष्टी मुळे सुरक्षित वाहन चालविणे अवघड होवू लागले आहे.शहरातील नगर प्रशासन,नेते मन्डळी,नगर सेवक,सामाजिक संस्था काही विचार करुन तोडगा काढणार का,असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.
नगर पालिकेत सद्स्य नसल्याने प्रशासकावर कोणाचे नियंत्रण नाही.त्यामुळे नियमित कामे देखिल होत नाहित.डासांचे प्रमाण वाढले आहे,फवारणी केली जात नाही.
नविन वसाहती मध्ये रस्ते नाहित त्यामूळे थोड्या पावसाने चिखल होवून रस्ते निसरडे झाले आहेत,गटारी नाहित,पाण्याचा निचरा होत नाही.अनेक गोष्टीने नागरिक त्रस्त आहेत.शहराबाहेर रस्ते चकचकीत व शहरात खड्डेयुक्त.बाहेर अतिवेगाने अपघात व शहरात दुरवस्थेमुळे अपघात होत आहेत.यावर तात्काळ उपाय योजना करावी लागणार आहे.
प्रा.राजाभाऊ ठोंबरे.
सांगोला.