*सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर संस्थेबाबत मोठी बातमी*

सांगोला:- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था असा बहुमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी दिलेला आहे.
दरवर्षी विद्यापीठ वर्धापन दिन १ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील संस्था व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विविध पुरस्कार दिले जातात. विद्यापीठामार्फत सर्वोत्कृष्ट संस्था हा बहुमान श्रेष्ठ मानला जातो. शैक्षणिक संस्थांतर्गत पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणाऱ्या संस्थेस हा पुरस्कार दिला जातो.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर या शैक्षणिक संस्थेची स्थापना सन 1996 यावर्षी करण्यात आली. संस्था अध्यक्ष प्रा. एम एन नवले सर यांनी कमलापूर येथे मराठी माध्यम विद्यालय, आणि अध्यापक महाविद्यालय सुरू केले. याचबरोबर कोर्टी पंढरपूर आणि केगाव सोलापूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. तसेच या तिन्ही संकुलात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज इमारत गुणवत्तापूर्ण शिक्षक वृंद आणि सर्व सोयींनी युक्त अशी शिक्षण संकुले निर्माण केली.
प्रा एम एन नवले सरांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने अल्पावधीतच ही संकुले गुणवत्तापूर्ण शिक्षणाची केंद्रे तयार केली. संस्थेचे सहसचिव श्री संजय नवले सर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर कैलास करांडे आणि कमलापूर शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर श्री अशोक नवले यांचे मदतीने शिक्षण संकुलाची सर्व शैक्षणिक कार्य सुरळीत पार पडत आहेत.
याचबरोबर श्रीमती श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. एस के पाटील सर, एस के एन अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी पंढरपूरचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, आणि शेगाव संकुलातील एन बी एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांना लाभत आहे.
या सर्वांच्या एकत्रित कार्यांमुळे आज सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संस्था पदाधिकारी, विविध विद्यालय आणि महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.