फॅबटेकच्या विद्यार्थ्यांची युनिक टेक्नॉलॉजी प्रा.लि. या नामांकित कंपनीमध्ये निवड*

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, पदवी आणि पदविका च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अमोल श्रीमक्कळ , ज्ञानेश्वर शिंदे , विक्रम लवटे ,सुनील केंगार, कृष्णा केंगार, प्रशांत शिंदे, महेश जाधव, विश्वजित जाधव, नवनाथ शेळके, रोहित लवटे, अनिल वरकुटे, रोहन पाटील या विद्यार्थ्यांची युनिक टेक्नॉलॉजी, प्रा.लि. या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली, असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. धनंजय शिवपूजे यांनी दिली.
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करीत असते. या विभागामार्फत संभाषण कौशल्य व मुलाखती चे प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर विद्यार्थ्याचे भविष्याचा विचार करून व करियरच्या द्ष्ठीने मार्गदर्शन या विभागामार्फत केले जाते .
फॅबटेक चे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर , मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितीत डीन अँकँडमीक डॉ.शरद पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राहुल अवताडे , प्रा. शशीकांत माने , प्रा. संजय कुलाल ,प्रा. विवेकानंद जाकुकोरे, प्रा.प्रियांका पावसकर यांनीही अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या