न्यू इंग्लिश स्कूल संगोलाचे वक्तृत्व स्पर्धेत यश

सांगोला पंचायत समिती (शिक्षण विभाग) सांगोला व सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली.
सदरच्या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सहावी च्या गटात प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील अनुज अनिल आदलिंगे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर विराज विशाल शिनगारे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. इयत्ता सातवी ते आठवी च्या गटात इयत्ता सातवी मधील श्रावणी विष्णू माळी हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ क्रमांक संग्राम मोहन बनकर याने प्राप्त केला. इयत्ता नववी ते दहावीच्या गटात समृद्धी विष्णू माळी हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.सदरच्या विद्यार्थांना प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक दशरथ जाधव सर,श्रीरंग बंडगर सर,कोमल भंडारे मॅडम,स्मिता देशमुख मॅडम,वसंत आलदर सर व किरण पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदरच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर,प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,पर्यवेक्षक दशरथ जाधव व पर्यवेक्षक तात्यासाहेब इमडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.