*नाझरा विद्यामंदिर प्रशालेत अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*

 

नाझरा( वार्ताहर):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी संयुक्तरीत्या नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली.

 

सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य बिभीषण माने यांच्या हस्ते तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सार्थक केंगार,वेदिका धबधबे व जान्हवी बनकर या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.

 

त्यानंतर ज्युनिअर कॉलेजचे प्रा. मोहन भोसले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतीतून कशा पद्धतीने आदर्श घ्यावा त्याचे विविध उदाहरणातून स्पष्टीकरण दिले.या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button