महाराष्ट्र

महिलांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागते त्यामुळेच त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते – डॉ.निकिता ताई देशमुख

सांगोला येथे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

सांगोला पंचायत समिती  बचत भवन येथे  दिनांक 11/ 8/ 25 रोजी बोलत होते या वेळेस हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम कार्यालयातील महिला  कर्मचारी,अधिकारी यांचेसाठी घेण्यात आला.त्यावेळी 80 ते 90 महिला उपस्थित होत्या.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आकांक्षीत सांगोला तालुक्याचा विकासासाठी हिमोग्लोबिन तपासणी घेण्याच्या सूचना दिल्याने त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी  यांना आदेश दिल्यानंतर  डॉक्टर संदीप देवकते यांनी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित केले होते.
त्यावेळी सर्व महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होते  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉक्टर निकिता देशमुख (स्त्रीरोग तज्ञ ) यांनी भूषवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते
 त्यावेळी डॉक्टर निकिता देशमुख म्हणाल्या महिलांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागते आणि त्यामुळेच त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि  त्यांचे आरोग्य जर सदृढ असेल तर पिढी सदृढ जन्माला येईल असे मार्गदर्शन केले.
 गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी या पुढे प्रत्येक गणनिहाय महिलांची हिमोग्लोबिन,बीपी,शुगर ई. तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
 या कार्यक्रमस डॉक्टर संदीप देवकते यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व प्रस्तावना केली. सूत्र  संचलन
विस्ताराधिकारी मिलिंद सावंत  यांनी केले.या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी दिपाली जाधव उमेदचे अण्णासो अवताडे, पंचायत  अधिकारी महिला, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कार्यालयीन महिला स्टाफ , अशा कार्यकर्ते आरोग्य सहाय्यक जिलानी काझी,सुनील माने , सविता माळी, महानंदा कसबे, विकास बनसोडे, शेखर सुरवसे, डॉक्टर अक्षय कांबळे, रक्त चाचणीसाठी एच एल एल  लॅबचे पंकज वाघमारे, रसिका गेजगे,व पंचायत समितीचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button